मोठी बातमी! नागपुर - मुंबई महामार्गावर ट्रक व कारचा भीषण अपघात , दोघांचा जागीच मृत्यु

 


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अपघातांची मालिका अद्याप सुरुच आहे. नागपूर-मुंबई महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. ज्यामध्ये दोन जण जागीच ठार तर दोन जखमी झाले आहेत.

अपघातात दोघांना दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे 

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर-मुंबई- महामार्गावर कोंढाळीपासून ७ किमी अंतरावर खुर्सापार पोलीस चौकी जवळ ट्रक व कारचा भीषण अपघात झाला. 

या अपघातात दोघांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला असून अपघातात दोन जण जखमी झाली आहेत. हा अपघात इतका भीषण होता की धडकलेल्या कारचा चक्काचूर झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील दोन जखमींना महामार्ग पोलिसांनी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातानंतर महामार्गावर वाहनांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. 


Post a Comment

0 Comments