सातारा जिल्ह्यामधील दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या माण तालुक्यातील म्हसवड पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील खडकी परिसरात गांजा लागवडीवर छापा टाकण्यात आला आहे.
शेतात मका व डाळिंबाच्या बागेत लागवड केलेला तब्बल 1 कोटीहून अधिक किमतीचा 422 किलो वजनाची गांजाची झाडे हस्तगत करण्यात आली आहेत. म्हसवड पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात कुंडलिक खांडेकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोमवारी (ता.13) मध्यरात्री उशिरापर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरू होती. या आधी काही दिवसच म्हसवड शहरापासुन सुमारे दहा किलोमीटर अंतरावरील पानवण गावातील ऊसाच्या शेतात दडवून ठेवलेला तब्बल 15 लाख रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी धाड टाकून जप्त करण्याची केला होता. त्यानंतर आता कोट्यावधी रूपयांचा गांजा सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेला कुडलीक खांडेकर याने गेल्या तीन- चार वर्षापासून थोड्या फार प्रमाणात शेतातच गांजाची लागवड केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. गांजाच्या लावगडीवतून चांगला आर्थिक नफा आत्तापर्यंत मिळाला असल्याचे तपासा समोर येत आहे. त्यामुळे येवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड आरोपीने केली असल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे.
0 Comments