कऱ्हाड: सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कोळे येथील एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळच्या प्रहरी समाेर आली आहे.
सैन्य भरती करतो म्हणून नात्यातील एकाने दयानंद याच्याकडून नऊ लाख रुपये घेतल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. परंतु दयानंद याला सैन्यात संधी मिळाली नाही. आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच त्याने टाेकाचं पाऊल उचलले.
दयानंद काळे याने आत्महत्या करण्यापुर्वी माेबाईलमध्ये समाज माध्यमातून स्टेटस ठेवले. त्यामध्ये त्याने फसवणूक झाल्याचा उल्लेख केला आहे. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.
0 Comments