रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

 


शिरुर : शिरुर -न्हावरा रस्त्यावर करडे गावच्या हददीत एका ट्रक्टरने महिंद्रा पिकअपला भरधाव वेगाने जोरदार ठोस दिल्याने अपघातात ताराचंद ज्ञानदेव वहिल रा.

शिक्रापूर यांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरवरील अज्ञात चालक फरार झाला आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. ३१) रोजी रात्री ०९ वाजल्याच्या सुमारास करडे गावच्या हद्दीत आय. एफ. बी. कंपनी पासुन दीड कि. मी अंतरावर, न्हावरा बाजुला शिरुर ते न्हावरा रोड वर ट्रॅक्टर नं. एम.एच. ४२ वाय ३६४८ या ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगात रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन निष्काळजीपणाने चालवून महिंद्रा पिकअप टेम्पो एम.एच. १४ सी. पी. ९३७२ यास ठोस देवून अपघात करुन अपघातात फिर्यादी अशोक राऊत यांचा कामगार ताराचंद ज्ञानदेव वहिल (वय ४२ वर्ष )रा. शिक्रापुर (ता. शिरुर), जि. पुणे, मुळ रा. मिरजगाव ता. कर्जत, जि. अहमदनगर यास गंभीर दुखापती होण्यास व त्याच्या मृत्युस तसेच कादिर खान याचे गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला झाला.

तसेच फिर्यादी महिंद्रा पिकअप टेम्पो एम.एच. १४ सी.पी. ९३७२ व ट्रॅक्टर नं. एम.एच. ४२वाय ३६४८ चे नुकसानीस कारणीभूत होवुन अपघाताची खबर न देता तो निघुन गेला. म्हणून फिर्यादी यांनी अज्ञात ट्रॅक्टरचालका विरुध्द कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढिल तपास सहाय्यक फौजदार चव्हाण हे करीत आहे.


Post a Comment

0 Comments