मुंबई : वाघ सिंह हे असे प्राणी आहेत. ज्यांच्यासमोर जायची हिंमत कोणीच करु शकत नाही. कारण एकदा का त्यांच्या हातात कोणताही प्राणी लागला की त्याचे प्राण वाचणे शक्य नाही.
म्हणून तर प्राण्यांना लांबवरुन देखील संशय आला तरी ते तेथे जात नाहीत. पण असं असलं तरी असा एक प्राणी आहे, ज्याच्याशी पंगा घेणं सिंहाला महागात पडलं आहे. हे ही पाहा : ना Hight पाहिली ना weight पाणघोड्यावर चढली थेट, पुढे सिंहिणंचं काय झालं तुम्हीच पाहा जंगलाचा स्वतःचा वेगळा कायदा आहे, जो तिथे राहणाऱ्या सर्व सजीवांना पाळावा लागतो. तो नियम असा आहे की सर्व प्राणी आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम आहेत.
तसेच प्रत्येक प्राणी जगण्यासाठी आणि स्वत:ची भूक भागवण्यासाठी एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे शिकार तर इथे होतच असते. यासंबंधीत बरेच व्हिडीओ देखील तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असेल. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे.
जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरंतर या व्हिडीओमध्ये एक सिंहाचं बछडा सापाची शिकार करण्यासाठी जातो. पण त्याला हे माहित नसतं की तो चुकीच्या प्राण्याची शिकार करत आहे. कारण सिंहाचा बछडा सापाजवळ येताच तो आपलं तोंड उघडतं, तेव्हा सापाला खतरा जाणवतो आणि तो सिंहावर थेट हल्ला करतो.
यानंतर या सिंहाला माघार घ्यावी लागते, ज्यानंतर तो मागे हटतो. या हल्ल्याने घाबरलेला सिंहाचा बछडा शांतपणे तिथून निघून जाणेच योग्य समजतो. तो निघून गेल्यावर सापही त्याच्या जागी आरामात बसतो. wildmaofficial या हँडलवरून हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. सोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'सापाकडून सिंहाच्या बछड्याने मोठा धडा शिकला असेल' या व्हिडीओवर लोकांचे वेगवेगळे कमेंट्स येत आहेत. एकाने कमेंट करत म्हटलंय की, 'सापालाही इतका राग येऊ शकतो हे अविश्वसनीय आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'सिंहालाही जंगलाचा कायदा समजला असेल. आता तो पुन्हा असा प्रयत्न करणार नाही.'
0 Comments