घरफोडी करून सव्वा सहा लाखांचा ऐवज लंपास

 



याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे घर गुरुवारी (दि. 16 ) दुपारी अडीच ते शुक्रवारी (दि. 17 ) सकाळी सव्वाअकरा वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास दोन चोरट्यांनी दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. पाच लाख 68 हजारांचे 152 ग्रॅम सोन्याचे आणि 20 हजारांचे चांदीचे असे एकूण सहा लाख 28 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments