जीवघेण्या अपघातातून थोडक्यात वाचला प्रसिद्ध अभिनेता, ट्रकवरील ताबा सुटला अन्

 


देव तारी त्याला कोण मारी’ काहीसं असंच घडलंय प्रसिद्ध तमिळ अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी याच्याबरोबर. अभिनेता विशाल कृष्ण रेड्डी नुकताच एका मोठ्या अपघातातून मरता मरता वाचला आहे.

तमिळ चित्रपटसृष्टीच्या सुपरस्टारने त्याचा आगामी चित्रपट ‘मार्क एंटनी’च्या शूटिंगचा एक व्हिडीओ शेअर करत स्वतःबरोबर घडलेल्या धक्कादायक प्रसंगाची माहिती दिली. त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

विशाल कृष्ण रेड्डीने त्याच्या ट्विटर हँडलवर ‘मार्क एंटनी’ चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्याबरोबर मोठा अपघात होता होता राहिला आहे. सुदैवाने अभिनेता यातून वाचला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना विशालने लिहिलं, “काही सेकंद आणि काही इंचाने देवाने माझा जीव वाचवला. देवाचे खूप खूप आभार. मी या घटनेनंतर स्तब्ध झालो आहे आणि आता पुन्हा स्वतःच्या पायांवर शूटिंग सेटवर परतलो आहे.”

व्हिडीओमध्ये दिसत आहे की चित्रपटाचं शूटिंग चालू आहे आणि सेटवर कास्ट आणि क्रूचे सगळे सदस्य शूटिंग करण्यात व्यग्र आहे. यातील फाइट सीक्वेन्समध्ये ट्रकचा वापर केला जात होता. ज्यात ट्रक भिंत तोडून बाहेर पडल्यानंतर थांबणं अपेक्षित होतं. पण अचानक या ट्रकचा ताबा सुटला आणि तो वेगात त्याच दिशेत पुढे येऊ लागला. त्याच ठिकाणी विशाल उभा होता. ट्रकवरील ताबा सुटलेला पाहून सेटवर गोंधळ उडाला. विशालचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments