अरेरे...! केवळ 300 रुपयांची लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात

 


जळगाव  : उतार्‍यावर नाव लावण्यासाठी अवघ्या ३०० रुपयाची लाच घेताना भुसावळ तालुक्यातील साकरी येथील महिला तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज रंगेहात अटक केली.

एम.एन.गायकवाड असे लाचखोर तलाठ्याने नाव असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

भुसावळ येथील तक्रारदाराचे सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी साकरी येथील महिला तलाठी एम.एन.गायकवाड यांनी तीनशे रुपयांची लाच मागितल्याने जळगाव एसीबीकडे मंगळवारी तक्रार करण्यात आली होती व लाच पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला.

गायकवाड यांनी लाच देण्यासाठी तक्रारदाराला खडका, ता.भुसावळ येथील कार्यालयात बोलावले व लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने गायकवाड यांना अटक केली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.


Post a Comment

0 Comments