घरफोडीत 5 लाखांचा ऐवज चोरीला

 



सुभाष छबुराव सरोदे (वय 60, रा. काकडे पार्क, चिंचवडगाव), प्रशांत सूर्यकांत देशमुख (वय 37, रा. केशवनगर, चिंचवड) यांच्या घरी चोरी झाली आहे.

सरोदे यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष सरोदे आणि त्यांच्या पत्नी शुक्रवारी (दि. 17) रात्री सव्वादहा वाजता घर बंद करून हॉस्पिटलमध्ये गेले होते.

रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कोयंडा उचकटून लाकडी कपाटातून 364 ग्रॅम वजनाचे पाच लाख 18 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्याच रात्री चोरट्यांनी केशवनगर येथे प्रशांत देशमुख यांचे घर फोडले. देशमुख यांच्या घरातून 12 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments