डोंबिवली: चाकुचा धाक दाखवून जबरी चोरी करून फरार झालेल्या चार पैकी दोन सराईत गुन्हेगारांना कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी रात्री शेलार नाका चौकातून अटक केली आहे.
देवेंद्र राजभर या फुलविक्रेत्याला चाकूने धाक दाखवित चौघांनी त्याच्याकडील १८ हजाराची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास पुर्वेकडील लक्ष्मी प्रोव्हीजन स्टोअर्सच्या समोरील शंकर मंदिराच्या बाजुला घडली होती. शिवा तुसांबड, छोटया चंदया, मोठा चंदया, वाणी अशा चौघांवर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा करीत होती. चौघांपैकी शिवा तुसांबड आणि आकाश उर्फ वाणी राठोड अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.
कल्याण गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक मोहन कळमकर, नवनाथ कवडे, पोलिस हवालदार अनुप कामत, बालाजी शिंदे, बापूराव जाधव, विलास कडू, पोलिस नाईक सचिन वानखेडे, पोलिस शिपाई गोरक्ष शेकडे यांच्या पथकाने दोघांना शेलार नाका, डोंबिवली पूर्व येथील त्यांच्या घरातून अटक केली. विशेष बाब म्हणजे यातील शिवा या आरोपीविरोधात रामनगर पोलिस ठाण्यात सात तर खडकपाडा पोलिस ठाण्यात एक असे चोरीचे आठ गुन्हे दाखल आहेत.
0 Comments