नागपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने घरासमोर खेळणाऱ्या चिमुरड्याला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत.
नागपुरातील जरीपटका परिसरामध्ये हि घटना घडली आहे. स्टॅनली सिल्वेस्टन जोसेफ (29, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. तो गुन्हेगार प्रवृत्तीचा आणि विकृत असून त्याच्याविरुद्ध वस्तीमध्ये तक्रार दाखल आहेत.
पीडित 7 वर्षीय चिमुकला मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घरासमोर खेळत होता. यावेळी स्टॅनलीने त्याला एक चॉकलेट आणि 10 रुपये दिले. त्यानंतर त्याला आणखी चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. त्या ठिकाणी त्याने या मुलावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर हा पीडित मुलगा रडत घरी आला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर आईने आपल्या मुलाला सोबत घेऊन जरीपटका पोलिसांत धाव घेतली आणि त्या नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपी नराधम स्टेनलीला अटक केली.
0 Comments