गुवाहटीत ८ कोटी रुपयांचं हेरोईन जप्त , चार चाकीसह तिघांना अटक

 


गुवाहटी - आसाम राज्यातील गुवाहटी पोलिसांनी तब्बल ८ कोटी रुपयांचे हेरोईन जप्त केले असून तिघांना अटकही करण्यात आली आहे.

येथील पूर्वी गुवाहटी पोलिसांनी बशिष्ठच्या नालासोपारा येथे अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध एक विशेष मोहिम राबवली होती. त्यामध्ये, ८ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी, आरोपी अब्दुल रोजीद, मुजम्मिल हक आणि मोहम्मद जमाल या तिघांना चार चाकी कारसह अटक करण्यात आलीय.

आसाममध्ये अंमली पदार्थांची तस्करी हा गंभीर बिषय बनला असून गुवाहटीत सर्वाधिक प्रमाणात ह्या कारवाई होत असल्याचे निदर्शन आले आहे. त्यामुळेच, पोलिसांकडून अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध विशेष मोहिम राबवण्यात येत आहे


Post a Comment

0 Comments