शिरूर/पुणे, : कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट विहीरीत जाऊन कोसळल्याची दुर्घटना पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथे घडली आहे.
शिरुरकडून मलठणकडे चालला होता तरुण
राहुल पठाडे हा तरुण आपल्या पांढऱ्या रंगाच्या अल्टो केटेन कारने शिरुरकडून मलठणकडे जात होता. मात्र येवले माथा येथून पुन्हा तो मागे वळून शिरुरकडे चालला होता. यावेळी ऊसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
कार अनियंत्रित झाल्याने विहिरीत पडली
अनियंत्रित कार रस्त्याच्या सोडून 15 फूट लांब असलेल्या विहिरीत पडली. यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली.
शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कठडे नसलेल्या धोकादायक विहिरी आहेत. यामुळे विहिरीत पडून मृत्यू होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. याबाबत विहीर मालकासह सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.
0 Comments