प्रेम प्रकरणातून मुंबईत भर रस्त्यात कॉलेज विद्यार्थ्याची हत्या

 


मुंबई : प्रेम प्रकरणातून भर रस्त्यात कॉलेज विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना चुनाभट्टीत घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेने आदित्य त्रिभुवन (१९) आणि खलफम सय्यद (२०) याला अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने १५ दिवसांपूर्वीच तरुणाला प्रेयसीपासून लांब राहण्यास सांगून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
यामध्ये चेंबूरला राहणाऱ्या मुद्दसिर मुख्तार शेख (१९) या तरुणाची हत्या झाली आहे. तो विवेकानंद एज्युकेशन सोसायटीमध्ये बीएएफच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेख हा सिंधी पोलिस चौकीच्या दिशेने पायी जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी धारदार शस्त्राने शेखच्या पोटावर, छातीवर, डोक्यावर वार केले.
या घटनेने परीसरात खळबळ उडाली. स्थानिकांच्या मदतीने तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत चुनाभट्टी पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला. त्यानुसार, आदित्य आणि खलफमला धारावीतून ताब्यात घेतले.

दोघांमध्ये झाले हाेते भांडण
गेल्या काही दिवसांत दोघांमध्ये भांडण झाले आणि प्रेयसी शेखसोबत फिरत असल्याची माहिती मिळताच, आदित्यने त्याच्या हत्येचा कट आखल्याची माहिती तपासात समोर आली. ही दुकली कुर्लावरून कल्याण आणि कल्याणवरून धारावीला येताच, ही कारवाई करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments