डंपरने माय- लेकीला चिरडले...

 


डांबरमिश्रीत खडी घेऊन जाणाऱ्या डंपर चालकाने अचानक वळण घेतल्याने डंपरच्या मागच्या चाकाखाली सापडून माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघात बुधवारी (दि.15) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बिबवेवाडी जंक्शन सिग्नलजवळ घडला.

रूपाली कल्पेश बोरा (वय 38) आणि गरिमा कल्पेश बोरा  (वय 8 दोघेही रा. सुपार्श्वनाथ सोसायटी, बिबवेवाडी) अशी मृत्यू झालेल्या माय-लेकीची नावे आहेत. याप्रकरणी ट्रकचालक राहूल कुंडलिक जाधव (वय 32 रा. आंबेगाव पठार) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली आणि त्यांची मुलगी गरिमा बुधवारी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होत्या.
त्यावेळी बिबवेवाडी जंक्शन  सिग्नलजवळ अचानकपणे खडी वाहून नेणार्‍या डंपर चालकाने वळण घेतले.
त्यामुळे डंपरच्या मागील चाकाखाली सापडल्यामुळे दोघही माय-लेक चिरडून गंभीर जखमी झाल्या.
त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली या मुलीच्या स्नेहसंमेलनासाठी बूट आणण्यासाठी गेल्या होत्या. घरी परतत असताना हा अपघात झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिरसट तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments