मालेगाव - येथील द्याने शिवारात असलेल्या यंत्रमाग कारखान्याच्या गोडाऊनला दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोडाऊन मध्ये ठेवलेले प्लॅस्टिक सुती, पॉलीस्टर कापडाचे वेस्टेज मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले.
आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग लागल्याचे समजताच येथील कामगारांनी बाहेर पळ काढला. आगीची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशामक पथक घटनास्थळी पोहचत स्थानिकांच्या मदतीने तासाभरानंतर आग विझविण्यात यश आले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही. मात्र शॉर्टसर्किंटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
0 Comments