हत्याराच्या धाकाने तरुणाला लुटले

 



दिवेश श्रीनाथ भाडळे (वय 23, रा. घाटे वस्ती, आंबेठाण, ता. खेड) यांनी म्हाळूंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी दिवेश त्यांचे हॉटेल बंद करून दुचाकीवरून आंबेठाण येथील अयोध्यानगरी जवळील मोकळ्या जागेतून घरी जात होते. यावेळी समोरून आलेल्या दोघांनी त्यांची गाडी  थांबवून पेट्रोलची मागणी केली. पेट्रोल देण्यास नकार दिला असता आरोपींनी दुचाकीची चावी काढून घेतली.

दिवेश यांच्याशी झटापट करून हत्याराचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील 75 हजारांची सोनसाखळी व 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली आणि पसार झाले. फौजदार गोसावी तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments