नाशिक - विवाह सोहळ्यातील आहेराची रक्कम असेलली पर्सच चोरट्यांनी लंपास केली. त्यात आहेराची दीड लाखाची रोकडसह दागिणे व मोबाईल असा सुमारे पावणे तीन लाखाचा ऐवज होता.
चोरीप्रकरणी सुरेखा संजय जाधव (रा.राज टावर जवळ, चेतनानगर) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस लॉन्स मधील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. जाधव या मंगळवारी (दि.३१) रात्री विवाह सोहळयानिमित्त जत्रा हॉटेल ते नांदूर लिंकरोडवरील समृध्दी लॉन्स येथे गेल्या होत्या. लग्नातील आहेरची रक्कम सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. पर्समध्ये रोकड ठेवून त्या हॉलमधील सोफ्यावर बसलेल्या होत्या. काही वेळाने त्या पर्स सोफ्यावर ठेवून बाथरूमला गेल्या असता ही घटना घडली. महिला बाथरूमला गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी पर्स चोरून नेली. यापर्समध्ये आहेराची सुमारे दीड लाखाची रोकड मंगळसूत्र आणि मोबाईल असा सुमारे २ लाख ८३ हजार ५०० रूपयांचा ऐवज होता. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक तोडकर करीत आहेत.
0 Comments