फलटण ग्रामीण, औंध, मेढा व लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जर्सी गाईची चोरी करणाऱ्या टोळीस फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
त्यामध्ये एकुण 33 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतुन जर्सी गाई चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. जर्सी गाईच्या चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे व पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत होणा-या जर्सी गाईच्या चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होऊन ते उघड करण्याकरीता गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन विशेष पथक तयार करण्यात आले होते. या विशेष पथकाने वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने गोपनीय तसेच तांत्रिक विश्लेषण करुन संशयीत आरोपी विनोद निवृत्ती खरात (रा. भांडवली ता. माण), संतोष शामराव सोनटक्के (रा. भांडवली ता.माण जि. सातारा), सतिश रमेश माने (रा. तोंडले ता. माण) यांना शिताफीने पकडले.
संशयिताकडे कौशल्यपूर्ण तपास केला केल्यावर त्यांनी फलटण ग्रामीण पोलिस स्टेशसन हद्दीत 3 ठिकाणी, औंध पोलिस स्टेशन, मेढा पोलिस स्टेशन, लोणंद पोलिस स्टेशन याठिकाणी असे 7 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यानुसार विविध गुन्ह्यांतील सुमारे 33 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या त्यामध्ये 9 जर्सी गाई 2 वाहने जप्त करण्यात आली आहे. गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरु असून अटक आरोपींचेकडून व ३ फरारी आरोपींच्या कडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, प्रमोद दिक्षीत, पोलिस उपनिरीक्षक, सहा. पोलिस फौजदार राऊत, पोलिस नाईक अभिजीत काशिद, पोलिस नाईक अमोल जगदाळे, पोलिस कॉस्टेबल महेश जगदाळे, पोलिस कॉस्टेबल विक्रम कुंभार यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला.
0 Comments