जुन्या वादातून तरुणावर हल्ला , आरोपीला अटक

 


रोहन सिमा शेख उर्फ रेहान दिनेश शेख (वय 19 रा.

कात्रज) असे अटक आरोपीचे नाव आहे. तसेच दोन विधी संघर्षीत बालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षामध्ये प्रवासी वाहतूक करीता थांबले असताना आरोपीने मोटार सायकलवरून येवून शस्त्राने वार करत जखमी केले  होते. फिर्यादी व आरोपी हे यांच्या जुना वाद झाला होता. त्याच रागातून आरोपीने फिर्यादीवर हल्ला केला होता.

यातील आणखी आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments