सात महिन्यांची गरोदर असणाऱ्या शिक्षिकेने उचलले ' हे, धक्कादायक पाऊल

 


औरंगाबाद शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 30 वर्षीष विवाहित शिक्षिकेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या  केली आहे.

घटना औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरात घडली आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हि महिला शिक्षिका सात महिन्यांची गरोदर होती. हि महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापिकेची नोकरी करत होती. 

वर्षा दीपक नागलोत (वय 30 वर्ष, रा. प्लॉट नं 78-78, गजानन कॉलनी, कन्या शाळेच्या बाजूला, गारखेडा परीसर) असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षिकेचे नाव आहे. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकत असताना 2012 मध्ये वर्षा यांची नातेवाईक असलेल्या दीपक नागलोत यांच्याशी ओळख झाली. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि त्याचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला. दीपक खाजगी कंत्राटदार आहेत. या दाम्पत्याला 8 वर्षांचा मुलगा आहे तर वर्षा पुन्हा एकदा 7 महिन्यांच्या गरोदर होत्या. 

इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलि कम्युनिकेशनमध्ये एमई करून सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या वर्षां यांनी एमआयटी महाविद्यालयातून ड्युटीवरून घरी आल्यानंतर बेडरूममध्ये पंख्याला ओढणीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हि गोष्ट लक्षात येताच पती दीपकसह सासरकडील मंडळींनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर सासरच्या जाचाला कंटाळून वर्षाने आत्महत्या केल्याचा आरोप मयत वर्षा यांच्या वडिलांनी केला आहे. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात याची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments