इरफान मेहबूब शेख (वय 24), गणेश सुभाष दिवार (वय 25)आणि अरविंद अर्जुन गालफाडे (वय 23) या तिघांना अटक करण्यात आली आहे. संदीप रामजतन जयस्वाल (वय 23) त्या तरुणाने तक्रार दिली आहे. बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि त्याचा मित्र पोलीस स्टेशन परिसरातून पायी निघाले होते. यावेळी त्याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे सिगारेट पिण्यासाठी शंभर रुपये मागितले. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. अन्य एका आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील पाच हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसका मारून चोरून नेली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
0 Comments