भरदुपारी दुचाकीस्वारांनी लुटले 9 लाख....

 


बँकेतून 9 लाख रुपये काढून कार्यालयात जात असलेल्या व्यापार्‍याच्या नोकराची बॅग दुचाकीवर आलेल्या दोन लुटारूंनी हिसकली व पळून गेले.

आज सोमवारी भरदुपारी छाप्रूनगरात अवघ्या काही क्षणात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी लुटारूंचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ए.पी. गणात्रा हा कोळसा व्यापारी आणि कंत्राटदार नर्मदाकुमार अग'वाल यांच्या हिवरीनगरमधील कार्यालयात काम करतो. आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने इतरांचे देणे द्यायचे होते. त्यामुळे गणात्रा याला बँकेतून 9 लाख रुपये काढून आणण्यास सांगण्यात आले. दुपारी दोन वाजताच्या सुमारास तो मोटारसायकलने टेलिफोन एक्स्चेंज चौकातील अ‍ॅक्सिस बँकेत गेला. गर्दी असल्यामुळे तेथे थोडा वेळ लागला. बँकेतून 9 लाख रुपये काढले. रक्कम असलेली बॅग मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीवर ठेवली आणि कार्यालयात निघाला.

टेलिफोन एक्स्चेंज चौक ते हिवरीनगर चौक दरम्यान छाप्रूनगर चौकातून जात असताना मागून मोटरसायकलवर दोघे आले. हेल्मेट घातलेल्या दोघांनी त्याला थांबवले. पेट्रोल टाकीवरील बॅग हिसकून क्षणात ते भरधाव पळून गेले. गणात्राने आरडाओरड केली. परंतु, तोपर्यंत लुटारू नजरेआड निघून गेले होते. गणात्राने मालकाला मोबाईलने कळवले. मालकाने लकडगंज पोलिसांना कळवत घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत लकडगंज पोलिस व गुन्हे शाखेचे पथकही तेथे पोहोचले. त्यांनी गणात्राकडून लुटारूंची माहिती विचारली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. लुटारू पळून गेलेल्या दिशेने सीसी टिव्ही कॅमेर्‍यातील चित्रीकरण तपासणे सुरू केले.

या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलिस अधिकारी तेथे पोहोचले. गणात्राची त्यांनी विचारपूस सुरू केली. तो नेहमीप्रमाणे बँकेत पैसे काढायला गेला होता. जवळच्या व्यक्तीने टीप दिली असावी. त्याआधारे त्याचा लुटारूंनी पाठलाग केला. या घटनाक'माचा पोलिसांना संशय आहे. लुटमारीची घटना सीसी कॅमेर्‍याने टिपली. त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून लुटारू फार वेळ दूर राहू शकणार नाहीत, असा पोलिसांना विश्वास आहे.


Post a Comment

0 Comments