नालासोपारा:- सात लाख रुपयांची चोरी करून नेपाळ येथे पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला सुरत विमानतळावरून तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपीकडून ५ लाख ६५ हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
प्रगती नगरच्या शिवसाई अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सरोजा यादव (४०) यांच्या घरातून १३ फेब्रुवारीला चोरी झाली होती. त्यांच्या घरातील टेबलखालून ७ लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग आरोपी नवीन बिस्ट याने चोरी करून पळून गेला होता. याप्रकरणी तक्रार आल्यावर तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. सदर गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत तुळींज पोलिसांना मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या.
गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक व गुप्त माहिती मिळाल्यावर आरोपी नवीन बिस्ट याचे लोकेशन ट्रेस केले. तो सुरत येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खाजगी वाहनाने एक पथक सुरतला पोहचून आरोपी नेपाळला विमानाने पळून जाण्याच्या तयारीत असताना विमानतळावरील सुरक्षा अधिकारी यांची मदत घेऊन विशेष पास घेऊन विमानतळावर प्रवेश करून आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळाले. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरी केलेली रोख रक्कम ५ लाख ६५ हजार रुपये हस्तगत करत दीड लाख रुपयांचा आयफोन आणि कपडे जप्त केले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव आणि तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, आशपाक जमादार, पांडुरंग केंद्रे, शशी पाटील, बागुल, छबरीबन, राऊत यांनी केली आहे.
0 Comments