महिलेचा गळा दाबून खून, पती आणि मुलावर पोलीसांना संशय

 


तसलीम जमीर शेख (वय 37, माऊली कृपा बिल्डिंग, जय मल्हार रोड, पिराचा चौक, उरुळी कांचन) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमूल लक्ष्मणराव घोडके यांनी तक्रार दिली आहे.

अधिक माहिती अशी की, राहत्या घरात तसलीम जमीर शेख या महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात सविच्छेदनासाठी दाखल केला होता. संविच्छेदन अहवालात गळा दाबल्यामुळे आणि शरीरावरील बोथट जखमामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते.

या महिलेचा खून झाला त्यावेळी घरात तिचा 45 वर्षे पती आणि 18 वर्षे मुलगा दोघेच उपस्थित होते. त्यामुळे या दोघांनीच या महिलेचा खून केला असावा असा दाट संशय पोलिसांना आहे. लोणी  काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments