चीमठाणे (जि. धुळे) : भरवाडे (ता. शिरपूर) येथील विवाहितेने माहेरून कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून शारीरिक व मानसिक छळ प्रकरणी पती, सासू व सासरे यांच्याविरोधात शुक्रवारी (ता.शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
अक्कडसे (ता. शिंदखेडा) येथील माहेर असलेल्या रोहिणी सुनील निकुम (वय १९) यांचा विवाह १२ एप्रिल २०२२ भरवाडे येथील सुनील सुरेश निकम यांच्याशी झाला होता. लग्नानंतर पती सुनील निकुम, सासू सखूबाई सुरेश निकुम व सासरे सुरेश नागो निकुम (सर्व रा. भरवाडे) हे वेळोवेळी टोमणे मारून लग्नात हुंडा कमी दिला, मानपान दिला नाही व चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक करीत होते.
तसेच कर्ज फेडण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून मारहाण करीत घराबाहेर हाकलून देत होते. आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सासरच्या लोकांची मागणी पूर्ण होऊ शकली नाही म्हणून छळ करण्यात येत असल्याची तक्रार दाखल झाली. या प्रकरणी पती सुनील सुरेश निकुम, सासू सखूबाई सुरेश निकुम व सासरे सुरेश नागो निकुम यांच्याविरुद्ध मारहाण करणे तसेच शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा दाखल झाला.
0 Comments