सामाजिक सुरक्षा विभागाने जुगार अड्डयावर छापा टाकून 66 हजारांचा ऐजव जप्त करीत 25 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई घोरपडीगाव परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली.
सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व पोलीस अमंलदार पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी वानवडीतील घोरपडी गावात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून 24 जणांना ताब्या घेतले. त्यांच्याकडून 66 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
आरोपींविरूद्ध वानवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलमानुसार कारवाई केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, अमित जमदाडे यांनी केली.
0 Comments