विकास साधू गाडेकर (वय 34, रा .आंबेडकर नगर, लांडेवाडी, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मुलांशी का बोलतेस, असे म्हणत आरोपीने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादी यांच्या आई वडिलांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी सोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
0 Comments