सुरत येथील दोन व्यापाऱ्यांनी नंदुरबार येथील वृद्धाची पाच लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस सूत्रांनुसार, राजेशकुमार एम. वाला (४५), जालंधर मनीष कुन्नूभाई. (४३, रा. रिदम पेपर्स प्रॉडक्ट, सुरत) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
या दोघांनी नंदुरबार येथील सेवानिवृत्तवृद्ध बाळू काशिनाथ कुवर (६९, रा. तिरुपतीनगर, नंदुरबार) यांच्याशी २०१९ मध्ये व्यवहार केला होता. त्यापोटी त्यांना पाच लाख रुपये दिले होते. ते वाला व कुन्नूभाई यांनी वेळेवर परत केले नाहीत. त्यामुळे कुंवर यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर त्यांच्यात समझोता होऊन दोघांनी चार लाख ५० हजार रुपयांचा धनादेश दिला. परंतु हा धनादेश बँकेत बाउन्स झाला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे कुवर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने सोमवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी नंदुरबार शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून राजेशकुमार वाला व जालंधर कुन्नूभाई यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार प्रवीण पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
0 Comments