चोरट्यांनी किराणा दुकान फोडून ४५ हजार १०० रुपयांचे साहित्य लंपास केले. ही घटना १२ फेब्रुवारीच्या रात्री हनुमान चौक, चिकलठाणा परिसरात घडली.
याप्रकरणी प्रमोद खाडे (३२, रा. चौधरी कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे हनुमान चौकात तिरुपती प्रोव्हीजन हे किराणा दुकान आहे.
दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करत चोरट्यांनी सिगारेट, गायछाप तंबाखूचे पोते आदि ४५,१०० रुपयांचा ऐवज लंपास केला. पुढील तपास हवालदार ओहळ हे करत आहेत.
0 Comments