उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील हीललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाण्याच्या खड्डयात बुडून दोन मुलांचा दुर्देवी मुत्यु झाल्याची दुखःद घटना काल घडल्याने विभागात शोककळा पसरली आहे.त्या बेजबाबदार ठेकेदारावर गुंन्हा दाखल करण्याची मागणी सतंप्त नातेवाईकांनी पोलिसांकडे केली आहे.
उल्हासनगर नंबर पाच नेवाळी नाका,जवळील डावलपाडा विभागात काही दिवसांपूर्वी एम.आय.डी.सी च्या अंर्तगत ठेकेदाराने जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले होते.त्यावेळी त्याठिकाणी एक खड्डा खोदला होता.त्यात जलवाहिनीतील पाणी त्या खड्ड्यात सोडण्यात आले होते.काल सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास परीसरात राहणारे दोन चिमुरडे सनी यादव(८),व सुरज राजभर(६)हे त्या ठिकाणी खेळत होते.त्यावेळी त्या दोघांचा पाण्यात बुडून मुत्यु झाला.त्या बेजबाबदार ठेकेदारावर त्वरित गुंन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी करत सतंप्त स्थानिक नागरीकडुन प्रशासन व पोलीस विभागाचा निषेध नोदवत रस्त्यावर उतरुन अंतिमसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला.या प्रकरणाचा पुढील तपास हीललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे हे करत आहेत.मात्र पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मुत्युची नोंद केली आहे.
0 Comments