कोपरगाव : दुचाकींची चोरी करणार्या टोळीला गजाआड करण्यामध्ये शहर पोलिसांना यश आले आहे. चार चोरांना पोलिसांनी गजाआड केले आहे, त्यांच्याकडून चोरी केलेल्या 3 दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, शहर पोलिसांनी तालुक्यातील संजय नगर, जेऊरकुंभारी येथून 11 मार्च 2023 रोजी चोरी गेलेल्या दुचाकी चोराचा शोध घेत असताना पोलिसांना महेश अण्णासाहेब गायकवाड (रा. राहाता), नीलेश दिलीप जाधव (रा. राहाता), किरण चंद्रकांत जाधव (रा. जेऊर कुंभारी, ता. कोपरगाव) व सोमनाथ किसन वरशिळ (रा. जेऊर कुंभारी, ता कोपरगाव) हे मिळून आले.
त्यांनी विविध दुचाकी चोरीबाबत कबुली दिली. आरोपींकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. सदर चोरांनी अजून कुठे कुठे चोर्या केल्या आहे का? याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करीत आहे. सदरचा तपास पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, पोलिस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे भरत दाते, संजय पवार, पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलिस नाईक अर्जुन दारकुंडे, महेश गोडसे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश थोरात, संभाजी शिंदे, गणेश काकडे,राम खारतोडे,यमनाजी सुंबे, महेश फड आदींनी केला आहे. पोलिसांचे कौतुक होत आहे.
0 Comments