निगडी: पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ

 


राजू लक्ष्मण कांबळे (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेच्या आईकडून आरोपी पतीने वेगवेगळ्या कारणांसाठी पाच लाख रुपये घेतले. त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी आणखी तीन लाख रुपये आणण्याची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने फिर्यादी, त्यांची मुलगी आणि आईला मारहाण करून शिवीगाळ केली. फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला  असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments