चाकण; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार


 पांडुरंग किसन झाडे (वय 26, रा. चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी पांडुरंग याने पीडित मुलीसोबत जवळीक साधून तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी नेले.  

तिथे मुलीला तिच्या घरच्यांना जीवे मारून टाकण्याची तसेच तिची बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यामध्ये मुलगी गरोदर राहिली असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी पांडुरंग याला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments