पुणे: महाविद्यालयीन तरूणीचा रिक्षाचालकाकडून विनयभंग

 



त्यावरून पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन संजय जगताप (वय 39, रा. कोंढवे धावडे) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी कोथरूड परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती कोथरुड परिसरातून गुरुवारी (दि. 16) सायंकाळी पाच वाजता रिक्षाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे निघाली होती.

त्यावेळी रिक्षाचालकाने विद्यापीठाजवळ रस्त्यातच रिक्षा थांबवून तरुणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने रिक्षाचालकाला विरोध करून ती रिक्षातून बाहेर पडली. परंतु रिक्षाचालकाने तिला धमकावून तिचा मोबाईल क्रमांक घेतला. या घटनेनंतर तरुणीने चतु:शृंगी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी पसार झालेल्या रिक्षाचालकाला अटक केली आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे पोलिस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments