नाशिक: दिंडोरी नाका परिसरात सोमवारी (दि 6) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास किरण गुंजाळ (रा.
पेठरोड) या युवकाचा भररस्त्यात प्राणघातक शस्त्राने वार करीत निर्घृण खून केल्याची घटना घडली असून या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
दिंडोरी नाका भागातील अभिषेक स्विट्स समोर ही खुनाची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी किरण गुंजाळ याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची मान छाटण्याचा प्रयत्न केला असून त्याच्या छातीत व पोटातही धारदार शस्त्राने वार केले आहे. पोलिसांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, ही घटना पूर्ववैमन्यस्यातून घडल्याचे सांगितले जात आहे. अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या या रक्तरंजित घटनेने पोलिसांसमोर शहरातील गुन्हेगारी नियंत्रणाचे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त गंगाधर सोनवणे, पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, रणजीत नलावडे घटनास्थळी दाखल झाले. मारेकऱ्यांचा शोध पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
0 Comments