चऱ्होली येथे फूल विक्रेत्यावर गोळीबार

 


याप्रकऱणी पोलिसांनी हरिओम पांचाळ (वय 20 रा.आळंदी देवाची) व हरीओमचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सिद्धेश सिताराम गोवेकर (वय 28 रा.वडमुखवाडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून घरी जात असताना आरोपींनी फिर्यादीला बस स्टॉप जवळ जुन्या भांडणाच्या रागातून पाठलाग करण्यास सुरुवात केली. तसेच हरीओम याने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीतून फिर्यादीच्या दिशेने दोन गोल्या झाडत जिवे मारण्याचा प्रय़त्न केला. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील  तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments