दुदैवी ! शेततळ्यात बुडून दोघा लहान भावांचा मृत्यू

 


अहमदनगर : आज सर्वत्र रंगपंचमी धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात या रंगपंचमीच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे घरासमोरील शेततळ्यात बुडून दोघा लहान भावांचा मृत्यू झाला आहे. आई-वडील घरी नसताना रविवारी दुपारी हे शेततळ्याजवळ खेळत होते. यादरम्यान तोल गेल्यामुळे त्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. 

आर्यन बंडोपंत साळुंखे (वय 9) व अनिकेत बंडोपंत साळुंखे (वय 8) अशी मृत पावलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. लोणीव्यंकनाथ ते येळपणे रस्त्यावर बंडोपंत साळुंखे आपल्या परिवाराबरोबर राहतात. रविवारी दुपारी ते पत्नीसह दुसऱ्याच्या शेतात कामाला गेले होते. यावेळी त्यांची दोन्ही मुले हि घरी खेळत होती. बंडोपंत साळुंखे यांनी घरासमोरच शेतीच्या पाण्याची सोय म्हणून 8 दिवसांपूर्वी शेततळे केले होते.

आज रविवारची सुट्टी असल्याने आर्यन व अनिकेत हे दोघे भाऊ घरीच होते. 8 दिवसांपूर्वीच्या त्यांच्या घरासमोर शेततळे करण्यात आले. खेळता खेळता ते अचानक शेततळ्याजवळ गेले. यादरम्यान त्यांचा तोल जाऊन हे दोघेही पाण्यात बुडाले. काही वेळात परिसरातीस लोकांच्या हि गोष्ट लक्षात आल्यास परिसरातील युवकांनी तळ्यात उतरून त्या दोघांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर त्यांच्या आईवडिलांना याची माहिती देण्यात आली. आपल्या दोन्ही मुलांचे मृतदेह बघून आईवडिलांनी हंबरडा फोडला.


Post a Comment

0 Comments