फर्दापूर : पळसखेडा (ता.सोयगाव) येथील तरुण शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.१०) साडेअकरा वाजता घडली.
सूरज उदयसिंग सेवगवन (वय २५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळाल्या माहितीनुसार सूरज सेवगवन हा तरुण शेतकरी पळसखेडा गट नंबर २१३ शेतात दूध आणण्यासाठी गेला होता. मात्र, तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तसेच गावातील नागरिकांनी त्याची शोधा शोध सुरू केली असता तो शेतकरी स्वतःच्या शेतातील विहिरीमध्ये मृतावस्थेत आढळून आला.
सरपंच व गावातील नागरिकांच्या या शेतकऱ्यास बाहेर काढण्यात आले. ग्रामीण रुग्णालय सोयगाव उपचारासाठी आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती फर्दापूर पोलीसांना देण्यात आली. जमादार नीलेश लोखंडे कुलते यांनी पंचनामा केला. तपास पोलिस निरीक्षक भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. मृत शेतकऱ्याच्या पश्चात आई, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.
0 Comments