पिंपरी: किरकोळ कारणावरुन एकास बेदम मारहाण

 


इम्रान सादिक तांबोळी (वय 36, रा. काळेवाडी पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेब, दानिश, इरफान अन्य एकजण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नी आणि मुलांसह कपडे खरेदी करण्यासाठी पिंपरी बाजारात गेले. तिथे त्यांना एक तोंड ओळखीचा मुलगा दिसला.

त्याला फिर्यादी यांनी गॅरेजमधील काम सोडले, अशी विचारणा केली. त्यावरून त्या मुलाच्या चार साथीदारांनी फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण  केली. यात फिर्यादी यांच्या खांद्यावर, डोक्यात, हातावर दुखापत झाली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments