इंदापूर : इंदापूर शहरालगत असलेल्या माळवाडी येथे चोरट्यांनी चोरी केलेले 8 लाख 75 हजार रुपये किमतीचे साडे सतरा तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांच्या 4 तासात मुसक्या आवळून दागिने हस्तगत करण्यात इंदापुर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला यश आले असून पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार (ता.04) रोजी अशोक अंकुश व्यवहारे (वय 43 वर्षे, रा.क्षीरसागर वस्ती,माळवाडी ता.इंदापूर) यांनी इंदापूर पोलिस स्टेशन येथे त्यांचे घरातील साडे सतरा तोळे सोन्याचे दागिने कोणीतरी चोरून नेल्याबाबत फिर्याद दिली होती.
यानुरूप सदर घटनेचे गांभिर्य ओळखून इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथकास पाचारण करीत गुन्हयाचा तपास करण्याबाबत मार्गदर्शन केले.
त्याप्रमाणे प्रमाणे वेगवेगळया कुल्प्त्या वापरून व तांत्रीक विष्लेशन करून सखोल तपास करीत गुन्हयात दोन आरोपी सागर अरुण राऊत (वय 20 वर्षे, रा.टेंभुर्णी कोष्ठी गल्ली) व दादा बळी शेंडगे (वय 21 वर्षे रा.साठेनगर ता.इंदापुर) यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यांचे कडुन सदर गुन्हयातील चोरीला गेलेले 8 लाख 75 हजार रुपये किंमतीचे साडे सतरा तोळे सोन्याचे दागिणे हस्तगत करुन चोरीचा गुन्हा 4 तासात उघडकीस आणला आहे. आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली.त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार यांनी दिली.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामिण अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस निरीक्षक दिलीप पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार,
पोलीस हवालदार प्रकाष माने,पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव,पोलीस नाईक सलमान खान, लखन साळवे पोलीस अंमलदार नंदु जाधव, विनोद लोखंडे ,लक्ष्मण सुर्यवंशी व महीला पोलीस हवालदर शुभांगी खंडागळे यांच्या पथकाने केली.
0 Comments