कंटेनर - कारचा भीषण अपघात चार जण ठार

 

कुंडलवाडी: चंद्रायनपल्ली महामार्ग ४४ वर रविवारी (दि. १२) चारचाकी व कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले. यामध्ये कुंडलवाडी मधील दोन सख्ख्या भावांसह अन्य एकाचा समावेश आहे.


हैदराबाद नागपूर महामार्गावर एक कार (गाडी क्रमांक AP 29 AD 7909) भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या (गाडी क्रमांक HR-38 U7281) कंटेनरला धडकल्याने भीषण अपघात झाला.


 कुंडलवाडी येथील गणेश हानमंलू निरडी (वय २९), आदित्य हानमंलू निरडी वय अंदाजे (वय २७), प्रकाश सायलू अंकलवार (वय २९), निजामाबाद येथील साईनाथ भाळे हे चार जण जागीच ठार झाले आहेत.


 गणेश व आदित्य हे सख्खे भाऊ असून त्यांचा मोबाईल शॉपीचा व्यवसाय आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी निजामाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले आहेत. या घटनेमुळे कुंडलवाडी शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments