वरणगाव : बोदवड तालुक्यातील मनुर बु. येथील नवरदेवाकडील वऱ्हाड मंडळी पिंपळगाव खु. येथे आली होती. त्यानंतर नागेश्वर महादेव मंदिरात देवदर्शनास जात असताना पिंपळगाव व सुसरी शिवारात दुचाकी व एसटी बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये तिघे ठार झाले. या घटनेनंतर विवाह मंडपात एकच शोककळा पसरली.
त्यानंतर शेळके परिवारातील सचिन राजेंद्र शेळके (२६) हा त्याचे चुलते विजय जगन्नाथ शेळके यांना वरणगाव येथील नागेश्वर महादेव मंदिरात देवदर्शन घेण्यासाठी दोन मित्रासह जातो, असे सांगून बाहेर पडले. हे तिघे दुचाकीवरून मंदिराकडे जात असताना
वरणगावकडून येणाऱ्या एसटी बसची जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच विवाह मंडपात एकच आक्रोश केला
दरम्यान, नागरिकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मयत भागवत याच्या पश्चात पत्नी एक मुलगी व एक मुलगा आहे तर जितेंद्र चावरे यास पत्नी, एक मुलगा व सचिन हा अविवाहित आहे.
0 Comments