नांदेड : नांदेडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये एका चिमुकलीचा देखील समावेश आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मुदखेड- नांदेड रस्त्यावर मुगट परिसरात हा अपघात झाला. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ऑटो आणि आयशरमध्ये समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. ऑटो प्रवासी घेऊन मुदखेडच्या दिशेनं येत होता.
तर आयशर सिमेंटची पोती घेऊन विरूद्ध दिशेन चालला होता. मात्र चालकांना अंदाज न आल्यानं दोन्ही वाहनांची समोरा-समोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जाखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मृत प्रवासी तेलंगनामधील ऑटोतील प्रवासी मुदखेडच्या दिशेनं निघाले होते. मात्र वाटेतच रिक्षाला अपघात झाला. या घटनेत रिक्षातील चार प्रवासी ठार झाले आहेत. हे सर्व प्रावासी तेलंगनामधील असल्याची माहिती समोर येत आहे.
0 Comments