अवैध विदेशी मद्याची ट्रकमधून वाहतूक, 31 लाखांचा मुद्देमाल जप्त

 


नाशिक : महामार्गावर नाशिक ते पिंपळगाव बसवंत दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण येथील पथकाने कारवाई करीत सहाचाकी ट्रकसह विदेशी मद्यसाठा असा ३१ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करत एकाला अटक केली आहे.

यातून आंतरराज्य मद्यतस्करांची टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. (

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, नाशिक विभागाचे उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता. १६) दुपारी पिंपळगाव बसवंत टोलनाक्याजवळ सापळा रचला होता.

संशयित सहाचाकी आयशर ट्रक (एमएच ०४, एचडी १३१७) आला असता, पथकाने ट्रकला रोखले. ट्रकवरील प्लॅस्टिकच्या गोण्यांचे कवरिंग हटवून झडती घेतली असता, परराज्यातील विदेशी मद्यसाठ्याची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले.

ट्रकसह विदेशी मद्यसाठा असा ३१ लाख ४२ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. तसेच, ट्रकचालक रविशंकर सुखराम पाल यास अटक केली. या गुन्ह्यातील संशयित आंतरराज्य मद्य तस्कारांचा शोध पथकाकडून घेतला जात आहे.

निरीक्षक एस. के. सहस्त्रबुद्धे, दुय्यम निरीक्षक एम. बी. सोनार, आर. एम. डमरे, एस. व्ही. देशमुख, दीपक आव्हाड, विलास कुवर, एम. सी. सातपुते, पी. एम. वाईकर, सचिन पोरजे, गणेश शेवरे, सोमनाथ भांगरे, दीपक नेमनार, अण्णा बहिरम, गणेश वाघ यांनी ही कामगिरी केली. निरीक्षक सहस्त्रबुद्धे तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments