जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे सुसाट सुरु असल्याचे दिसून येतेय. गेल्या काही दिवसापूर्वीच मुक्ताईनगरात अन्न व औषध प्रशासनाने २५ लाख रूपयांचा चोरीचा गुटखा जप्त केला होता.
त्यानंतर आज रविवारी पुन्हा गुटख्याने भरलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली.
सध्या दोन नंबरच्या धंद्यांमुळे मुक्ताईनगर गाजत आहे. मुक्ताईनगर तालुक्याला लागून मध्यप्रदेशची सीमा असून तेथून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आणि अंमली पदार्थ हे इकडे येत असल्याचा आरोप आधीपासूनच करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वीच विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीअवैध गुटख्याबाबचा हा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर काही तासांमध्येच कारवाई करत अन्न व औषध प्रशासनाने २५ लाख रूपयांचा चोरीचा गुटखा जप्त केला होता.
यानंतर आज पुन्हा एकदा मुक्ताईनगर शहरात गुटख्याने भरलेला ट्रक पकडण्यात आला आहे. या ट्रकमध्ये पूर्णपणे गुटखा भरलेला असून याचे मूल्य हे खूप मोठे असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जप्त करण्यात आलेला ट्रक हा मुक्ताईनगर पोलीस स्थानकात जमा करण्यात आला असून फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते.
0 Comments