वर्धा: मलब्यात दबून दोघांचा मृत्यू, तीन सुखरूप

 


वर्ध्यातील सिंदी रेल्वेलगत गौळ शिवारात विहिरीचे बांधकाम सुरू असताना एक भाग खचल्याने मातीखाली दबून दोन मजुरांचा दुर्दवी मृत्यू झाला.

अमोल दशरथ तेंभरे व पंकज प्रभाकर खडतकर अशी मृतांची नावे आहेत.त्यांचे मृतदेह रात्री हाती लागले नाही.

आज सकाळपासून मृतदेह काढण्याचे काम परत सुरू झाले. सर्जेराव वरभे यांच्या शेतातील विहिरीत काँक्रीटचे बांधकाम करण्यात येत होते.

 त्यांच्या कुटुंबातील बापलेक तसेच मयूर व मनोज तेंभरे सुखरूप वाचले. मलब्याखाली पाणी असल्याने मृतदेह काढण्यास अडथळे येत आहे. विशेष बचाव पथक अथक प्रयत्नात आहे.


Post a Comment

0 Comments