पुणे : पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवभक्तांच्या टेम्पोचा भिषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 30 ते 35 शिवभक्त जखमी झाले आहेत. यापैकी दहा जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
तर वीस जणांना किरकोळ मार लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बंगळुरू- मुंबई बायपासवर ताथवडे परिसरात हा अपघात झाला.
ताथवडे परिसरात भीषण अपघात घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन हे शिवभक्त एका खासगी टेम्पोने लोणावळ्यामधली शिलाटणे येथे निघाले होते.
टेम्पो बंगळूरू -मुंबई बायपासला आल्यानंतर या टेम्पोला मागून कंटेनरने धडक दिली. ताथवडे परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 30 ते 35 शिवभक्त जखमी झाले. त्यापैकी दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
तर वीस जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन हे शिवभक्त एका खासगी टेम्पोने लोणावळ्यामधली शिलाटणे येथे निघाले होते. मात्र ताथवडे परिसरात त्यांच्या टेम्पोला मागून कंटेनरले धडक दिली. यात तीस ते पसत्तीस जण जखमी झाले आहेत. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
0 Comments