चांगदेव गणपत शिंदे (वय 38) आणि रामदास धारू शिंदे (वय 38 , दोघेही रा. शिंदेवाडी, मलठण, शिरूर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत तत्कालीन वनरक्षक रईस रहेमान मोमीन (वय 25 , रा. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मलठण गावाच्या हद्दीतील राखीव वनात 19 मार्च 2017 रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला होता.
सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. तत्कालीन सहायक फौजदार के. डी. थोरात आणि पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी या गुन्ह्याचा तपास केला. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील, सहायक पोलीस फौजदार विद्याधर निचीत आणि पोलीस हवालदार रेणुका भिसे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. घटनेच्या दिवशी चांगदेव आणि रामदास शिंदे दुचाकीवरून राखीव वनात आले होते. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना 'तुम्ही येथे दुचाकी घेऊन थांबू नका' असे म्हटले. त्यामुळे दोघांनी फिर्यादी यांना शिविगाळ आणि दमदाटी केली. तसेच फिर्यादी कामावर असताना त्यांच्या कामात अडथळा आणला.
0 Comments