मुंबई: अंधेरीत इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग , एकाचा मृत्यू

 


मुंबई : पुढारी ऑनलाईन; अंधेरी (पूर्व) येथील साकी नाका मेट्रो स्टेशनजवळील इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली. या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी आग विझवण्याचे काम सुरु आहे.

Post a Comment

0 Comments